Sunday, June 7, 2026

गर्भारपण

 

गर्भारपण! 
किती तरी जुनी गोष्ट;

जणु गेल्या जन्मीची!
तस खुप कष्टाचं तर होतच
पण आनंददायीही होतं.
आज एकदम का बरं
त्याची आठवण यावी ?
विमानात बसल्या बसल्या
गेल्या काही दिवसांचे
विचार मनात चालू होते.
गेल्या वर्षी तो येऊन गेला.
आणि मग पुढचे
नऊ साडेनऊ महिने
त्याच्या आठवणीत.
पुढच्या वेळी भेटलो,
की काय काय करायच?
त्याच्यासाठी काय काय न्यायचं,
कोणत्या गप्पा मारायच्या,
कुठे कुठे फिरायचं,
काय काय खेळायचे,
कोणत्या गमती जमती
आठवणी पुन्हा आठवायच्या?
कुठल्या नवीन तयार करायच्या?
कोणत्या चर्चा करायच्या,
कोणत्या पुस्तकांची
देवाणघेवाण करायची?
कितीतरी मनसुबे ...
नऊ साडेनऊ महिने साठवलेले.

आणि मग तो क्षण आला.
जेव्हा भेटले पुन्हा त्याला.
दोन अडिच महिने,
पुन्हा उपभोगून घेतले.
आईपण!
त्याचे लाड, कोड, कौतुक
त्याच्या कडून करून घेतलेले लाड.
खेळणं, भटकणं, गप्पा, चर्चा.
नुसतं एकमेकी सोबत बसणं.
त्याचा सहवास अनुभवणं.
त्याचा श्वास, त्याचा गंध.
त्याचा आवाज, त्याच्या लकबी.
त्याचं बोलणं, त्याचं नुसतं शांत बसणं.
अगदी त्याचं चिडणंही !

आणि मग पुन्हा ती वेळ आली.
परतायची !
अन याच परतीच्या प्रवासात,
सगळं गर्भारपण पुन्हा आठवलं.

खरच!
हे ही गर्भारपणच की!
नऊ साडेनऊ महिने
मनामधे सगळ्या गोष्टी
रुजवत ठेवायच्या.
कुठले कुठले मनसुबे,
मनात, पोटात वाढवत रहायचे.
आणि मग तो भेटला;
की या आकांक्षांची नाळ तोडायची.
अन जगून घ्यायचं
त्याच्या सह, सोबत.
अन मग जाणवलं
पहिल्या वेळेस जेव्हा
खरी नाळ तुटली,
तेव्हा नाही दु:ख झालं.
कारण ती नाळ तुटली,
म्हणून तर तो
कुशीत आला न माझ्या!

पण आता...
आता जेव्हा हे
दोन अडिच महिने भेटल्यानंतर
जी नाळ तुटते न
खुप खुप दुखावते
हेलावून टाकते अगदी.
अन मग
विमानाच्या एकांत अंधारात
कळत न कळात
आत डोळे गळत रहातात...
तसेच कधी तरी मग
डोळे मिटले गेले.
मधेच जाग आली
डोळे उघडले तर
विमानाच्या खिडकीतून बाहेर
अंधाराच्या अवकाशातून
हलकेच निळेपणा वर चढत होता.
हळू सोनेरी, राजवर्खी
हिरण्यगर्भ वर आला.
आणि मग पुन्हा मनात
आशा पल्लवित झाल्या.
पुन्हा एक नवीन गर्भारपण
सुरू झालं.
नऊ साडेनऊ महिन्यांचं.

मग पुन्हा भेटेलच,
येईलच तो कुशीत.
दोन अडिच महिन्यासाठी.

म्हातारपणचं
अलौकिक गर्भारपण!

---

Sunday, March 15, 2026

बकुळीच्या झाडा


बकुळीच्या झाडा
बकुळीच्या झाडा
ठरलय ना आपलं?
वाढायचं,
आपलं आपणच!
नको कोणाचा आधार,
आपल्याला आपणच
घालू आकाशाला गवसणी
अन उधळू सुगंध
या साऱ्या अंगणी

वाढ तुला हवं तसं
पसरू दे परिघ.
वाकू दे फांदी
झुकू दे अवकाश.
तुझा - तुला
तोल सांभाळणं 
जमतय तुला,
तोवर नकोच बघूस
कोणाच्या ही नजरा

हिरव्या गार पानांनी 
घे तुलाच वेढुन.
हवं तर उमलव
नाजुकशा कळ्या,
खूप खूप सगळ्या
अन दे उधळून साऱ्या
हलके हलके तरंगत
येऊ दे खाली
एक एक फुल
अन त्यातल्या
सुकूनही दरवळणाऱ्या
धुंद गंधासारखे
असेच असू दे
तुझं आसुसलेपण!

नाही उमलवलेस
रोज एक फुल
चालेल तरीही.
पण उमलवशील 
तेव्हा अशी उमलव;
असतील नसतील
ती सगळी फुलं, 
की आसमंत सारा 
येेईल तुला शोधत

मग,
ना तुझी 
उंची मोजली जाईल,
ना पाहतील आकार
ना पाहतील पानं
ना फांद्या
ना तुझा पसारा.
वा फुलाचा रंग.

बसं इवलुशा
बकुळ फुलावर
होईल बघ फिदा
सारी दुनिया!
---

Wednesday, March 11, 2026

"ऐक सखे!"



बायको म्हणून नवऱ्याचे
सारे ताण तणाव
हलके करतेसच तू.
कधी उत्तम स्वयंपाक,
कधी सुरेल गाणे,
तर कधी एखादी झप्पी,
अन कधी कधी तर
नुसतं तुझं असणं!
ते ही पुरेसं असतं.
"त्याचे" ताण तणाव
कमी करायला.
त्याच्या आरोग्याची,
त्याच्या तब्येतीची काळजी
तूच तर घेतेस.
त्याच्या आवडी निवडी,
त्याचं पथ्यपाणी, औषधं...
सगळं तुलाच तर
माहिती असतं!

अगदी तसच
तुज्या बाळांचं,
आई बाबांचं,
सासू सासऱ्यांचही,
शेजार पाजाऱ्यांचही,
अन मित्र मैत्रिणींचही!
सर्वांचेच ताणतणाव
पथ्य पाणी, अन तब्येती
सगळंच पहातेस;
अगदी निगुतीने,
अगत्याने, आपलेपणाने.

पण तुझं काय?
तुझे ता!तणाव,
तुझे आरोग्य, औषध पाणी
यांकडे कोण पहाणार?
नवरा, मुलं, नातेवाईक
असतीलच सोबत.
पण त्याहून महत्वाचं;
ते तुझं याबाबतचं
सजग असणं!
त्याकडे लक्ष आहे का,
तुझं?
तुझं खाणं पिणं,
औषध पाणी
व्यायाम - शरीराचा, मनाचा.
आराम - शरीराचा, मनाचा.
देखभाल - शरीराची, मनाची.
करतेयस न तू?

बघ हं,
गृहिणीपद सांभाळायचय.
तर आधी गृहिणीला
सांभाळायला हवं.
लक्षात येतय?

---

Thursday, February 19, 2026

दुलई


आकाशाची निळी निळाई

त्यावर दुलई शुभ्र पांढरी

कुणी उधळली निलपरी वरी

ही कापसाची पिसे अशी?


रविकर तो लयास जाई

दाटदाटली पिसांची दुलई

अलवर गंध अंधाराचा तोही

पिसा पिसांवर दाटुनी येई!

Monday, February 9, 2026

म्हटलं ना...

 

भेटावं लागतं कधीतरी
आपल्याला, आपल्याच मनाला...

आपणच कधीकधी स्वतःचाच
येतो राग, होते चिडचिड
आपलीच एखादी कृती,
विचार बोचत राहतो
टोचत राहतो जिव्हारी लागतो
मन खात राहतं
स्वतःलाच!

अन मग शरीर
मनाला शांत करायला
स्वतः खात राहतं
अरबट चरबट
समोर दिसेल ते
मग तर काय
शरीराही चिडतं, कावतं
संप करतं
नाही तर सरळ
भडाभडा ओकून टाकतं

आणि मग तेव्हा जाणवत
गडबड आहे काहीतरी
हुकतय काहीतरी चुकतंय काही तरी
शरीर थकून जातं
मन तर कधीच सुकलेलं...

मग एखादी शांत संध्याकाळ
हातात कॉफीचा कप
आणि आपलीच आपल्याला सोबत!

निवळत रहातं आकाश
झिरपत जातो सायंप्रकाश;
हळूहळू मनातही!
काही तरी उलगडू लागतं
सात कप्प्यातलं
भळभळून व्हायला लागतं
खोल थिजलेल्या जखमा,
कोण कुठले दुखरे आप्त
तरंगू लागतात
मनाच्या तळ्यात
धुवत धुवत होऊन जातं
सारं मन अवकाश ...

डोळ्यातून पाझरतं काय काय
चूक, संताप, चिडचिड,
असहाय्यता, आक्रमकता,
एकटेपणा, भ्रमनिरास,
फसवणूक, निराधार...
सगळं सगळं
भसभसून वाहून जातं.

आणि मग येते
एक नीरव शांतता
आता नसतात कोणीच
राग, लोभ, नसतात क्लिमिषं
नसतात आरोप 
नसते अपराधीपण
नसतो एकटेपणा
आता मन मनाशीच बोलू लागतं
काय, कुठे, कसं, किती,
का, कोणी, केव्हा, कशाला...
हळूहळू उलगडत जातात
सारेच प्रश्न!

फक्त ती वेळ यावी लागते.
म्हटलं ना,
भेटावं लागतं कधीतरी
आपल्याला, आपल्याच मनाला!

Saturday, February 7, 2026

हलके हलके...

 

होने लगी मुलाक़ाते हलके हलके,

बढ़ने लगी वो बाते हलके हलके…


तेरी हँसी से महक उठा हर एक मौसम,

दिल ने सीख लिया मुस्कुराना हलके हलके…


आँखों में सजने लगे रंगीन ख़्वाब कई,

रूह ने ओढ़ ली तेरी चाहतें हलके हलके…


तेरे क़रीब आते ही खिल उठा वजूद,

साँसों में बसने लगी राहतें हलके हलके…


बिन कहे समझ आने लगे सारे अरमाँ,

इश्क़ सिखाने लगा मोहब्बत हलके हलके…


जब तेरा नाम लिया होंठों पर, 'अवल'

ज़िंदगी ने जिना सीख लिया हलके हलके…

---

Thursday, February 5, 2026

सजदा


करते नहीं, शायरी हो जाती है आगे आगे
देखेंगे क्या ग़ज़ल, होती है आगे आगे

इतना ना करो गुरूर, ए हस्ती हम पे,
फ़ना की राह है, सालिक चले आगे आगे

ज़ख़्म भी सज्दा करते हैं, दर ए इश्क़ पे,
हर दर्द बन जाता है, सजदा आगे आगे

मत कर तारीफ़, ये फ़ानी जिस्म की,
रूह का समंदर है, दीदार आगे आगे

पी ली मय ए इश्क़, हमने ख़ामोशी में,
होश जाता रहा, वजूद मिटता रहा आगे आगे

दीदार-ए-यार तो, हो ही चुका 'अवल',
बस रब मिलता है, बंदा खोता है आगे आगे
---

Tuesday, February 3, 2026

रात्र

पश्चिम जसजशी काळवंडत जाते,

पूर्वेकडे टेकडी वरचे धुके

खाली गावांत

हळूहळू घसरत येतं.

घरा घरात मिणमिणते,

पिवळे दिवे लागतात.

चुलीमधे लाल केशरी निखारे

धगधगू लागतात.

लोखंडी तवा तापू लागतो.

अन त्यावरच्या भाकरीचा

खरपूस वास दरवळू लागतो.

अन मग धुराड्यातून

धूर बाहेर पडतो,

धुक्याला भिडतो.

भाकरीच्या उबेची 

मिठी घालतो.


अन दिवसभराचा ताप,

रात्र अशी कुशीत घेते!

---

Monday, December 29, 2025

अस्तित्व

दिंडी निघोन गेली कधीची, पहाटेच्या निरवतेस

निर्मल्या सोबत मी मागे,  पंढरीची आस.


रामकृष्ण हरी घोष, सर्वांच्या ओठी होता

माझ्या अंतिम यात्रेचा तो, रामनाम होता

सोडला शेवटचा तो श्वास, सुटकेचा होता

माझ्या खुन्याचा तो, अबोल शोक होता

----

{माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता मला साधायची होती. पण इतरांसोबत, इतरांसारखी नाही. त्यामुळे सर्वांच्या बरोबर मी नाही गेले.

सर्वांच्या जगण्याची पद्धत(रामकृष्णहरी घोष) बघण्याचा नादात मी माझी जगण्याची पद्धत शोधायलाच विसरले. 

माझ्यातलं चटकन पुढे न होणं, रादर शक्यता असून स्वत:ची वाट ठामपणे न धरणं. यातून माझीच प्रगती खुंटवली. तर हे जे माझ्यातलं झिजकणं आहे ते म्हणजे माझीच मी खुनी असणं. 

हे सगळं समजे पर्यंत शेवट जवळ आला. पण हे समजलं म्हणून मी सुटकेचा श्वास सोडला. अन माझ्यातल्या त्या खुन्याला या सगळ्याचे दु:ख ही आहे.}

Friday, October 3, 2025

उद्या कसा उगवेल, उगवेल तरी का...

कॉफीची टेबलं आता मोकळी पडली आहेत

तिथला बुद्धीला चालना देणारा दरवळ

खोल खोल दडपला गेला आहे

कॉफी शॉपमधली एकूणच ये जा मंदावली आहे

रस्त्यावरच्या पहारेकऱ्यांच्या सावल्या हलताना दिसताहेत

क्षितिजावरचे काळे ढग भराभर पुढे सरकत आहेत

लेखकांच्या लेखण्यांवर केशरी राप चढला आहे

अन पानांवर आधीच ..नामाची छपाई झाली आहे

शाळा महाविद्यालयांतून घोकंमपट्टी ऐकू येते आहे

पुस्तकांच्या दुकानातली इतिहासाची पुस्तकं हरवली आहेत

प्रयोगशाळा तर कधीच्याच कुलुप बंद झाल्या आहेत

जुन्या पोथ्यांमधला न समजणारा मजकूर उद्घोषित केला जातो आहे

प्रत्येक विचारी मेंदूवरती परंपरेचा झिरझिरीत पण प्रभावी पडदा सरकवला गेला आहे

सुख समृद्धीच्या चंगळवादाने विचारांवर आपले जाळे पसरले आहे

चार भिंतीतील माझं सुरक्षित जग जोपासलं जातं आहे

त्या घरांचा पाया मात्र खोल खोल रुतत चालला आहे

क्षितीजावरचा सूर्यही हळूहळू दृष्टीआड होतो आहे

उद्या कसा उगवेल, उगवेल तरी का

असा प्रश्न पडणारी माणसं ही हरवत चालली आहेत...

---

Friday, September 26, 2025

जरा जो वाजला...

जरा जो वाजला, फक्त पाचोळा होता

वसंतातला पानांचा अश्रुपात होता

आताच कुठे जरा अंकूर फुटला होता
आता कुठे हिरवा रंग चढू लागला होता

सारा ऋतु तर बहरण्यास दिला होता
बाग फुलवण्यात सारा श्वास दिला होता

अवल जोही प्रयत्न केला पुरेसा नव्हता
प्रत्येक फुलामागे एक एक काटा होता

Thursday, September 18, 2025

बहारों ने इतना रुलाया है मुझ को

बहारों ने इतना रुलाया है मुझ को

कई बरसातें बरस गई , यारों....

गुल खिले है इतने रंगीन सारे
के रंग जिंदगीका उजडा हुआ है

लदी हुई है टहनी, फलोंसे
पर नीरस हुई है जवान सॉसें

पेडों पर निकले है पत्ते बहार के
बस उजड गया है आशियाना यारों !

Sunday, August 3, 2025

You Are a Parent, Not a Superparent

1.

You are a parent; not a superparent.

First, you should be calm,

You should be composed.

Only then can you calm and help your child.


You are a parent; not a superparent.

First, you should be happy,

You should be satisfied.

Only then can you comfort and make your child happy.


You are a parent; not a superparent.

First, you should give your child a chance to explore,

A chance to try evreything.

Only then can the child learn and gain experience.


You are a parent; not a superparent.

So just be a parent; happy, satisfied.

and confident.

And you will naturally raise a confident, happy child.


-Arati

----


2.


You are a parent; not a super one.

No need to shine like the blazing sun.

Be calm, be still, let worries fade.

Only then can your child feel safe and stay unafraid.


You are a parent; not a flawless guide.

Be happy and satisfied inside.

When joy and peace in you are found.

Your child will feel that love all around.


You are a parent;  not meant to control.

Give your child freedom; that’s your role.

A chance to try, to think, to grow.

That’s how true learning begins to show.


You are a parent; and that’s enough.

You don’t need to always be strong or tough.

Be happy, be sure, let pressure slide.

And raise a confident child with pride.


-Arati

Tuesday, June 17, 2025

सखा

 (हॅन्री लॅंगफेलो यांच्या द अॅरो अँड द सॉंग कवितेचा स्वैर अनुवाद)


तीर सुटला सुटला

कुठे गेला ते कळेना

पापणी लवता लवता

झाला तो दिसेनासा


गीताच्या ओळी बारा

पहा आल्या सरा सरा

जशा आल्या तशा त्या

झाल्या पसार कुठेशा


त्याने बांधियले पूल

त्या तीराला शोधुनी 

त्याच्या हृदयाची धून

माझ्या गीताला बांधली

-

Sunday, May 18, 2025

तथागताचे शांत हसू!

जगातल्या सर्वात उंच पठारावर
गारठलेल्या समुद्रभूमीतून 
जास्तीत जास्त गडद, रंगीत, कठीण रत्न 
दिवसोंदिवस वाकून शोधलेली
अन मग अनेको दिवस त्यांना
खट्ट खरखट्ट करत उखळीत दळलेली
अन तयार झालेली रवाळ, रंगीत वाळू.
हे सर्व करताना आलेले निसर्गभान 
आसपासच्या निरव शांततेची जाणीव 
वाऱ्याची अन खालच्या नद्यांची गाज 
निसर्गाचं आपल्याशी असणाऱ्या नात्याची जाण
त्यातून आलेला संयत साधनेचा प्रयास
चिंतन आणि मनन यातून आलेल्या एकात्म आकृत्या
आणि अंतिम शांततेच्या त्या उदगात्याचे स्मरण!

अन मग त्या सगळ्यांचे सार उतरवत
विश्व, निसर्ग, मानवी मन याच्या संरचना 
भौतिक आकृत्यातून विविध रंगात रचताना
"चक्र पूर" मध्ये रंगीत वाळू भरून
त्यावर तारांनी आघात करत
कर कर कर कर या तालात
त्यांच्या समन्वयातून पडणारी संततधार -
रवाळ रंगीत वाळूची संततधार
घेत जाते विविध आकार, रंग, आकृती
एक वा अनेकांची तपश्चर्या, साधना 
उलगडत जाते लाकडी चवथऱ्यावर
एक विश्व!

आणि मग तो दिवस येतो
पूर्ण होते वालुका मंडल!
उत्कट रचना, अमूर्त शांतता, सशक्त ताकद
रचणारे, बघणारे, वास्तु, आसमंत, सृष्टी... 
सर्वच सुचिर्भूत होते; निरोगी होते; पवित्र होते.
बाहेरून,आतून, सूक्ष्मातून एक सच्चिदानंद संवाद.
करुणा, सहसंवेदना, नश्वरतेची जाणीव
अन वैश्विक उपचार पाझरत राहतात. 
सगळे स्वच्छ, सुंदर, तरल, निरभ्र करून टाकतात
विश्वाचे, मनाचे, ज्ञानप्राप्तीच्या मार्गांचे
ध्यान, एकाग्र, चिंतन, अध्यात्म
यांना चालना देत उभे राहते
रंगीत वालुकामय मंडल!

आणि मग येतो तोही क्षण
संपूर्ण मंडलाच्या सर्व त्रिज्यातून
एकत्र येत जातात सर्व दिशा,
सर्व रंग, सर्वमिती, सर्व आकाश
आणि मध्यात तयार होत जाते
हे निरंग सत्व!
सूचवत जाते विश्वाची नश्वरता
त्याचा सहज, तत्पर, स्वीकार-
अन मग मृतघटिकेत सामावून
आणले जाते पुन्हा नदीच्या तीरावर
तिथल्याच नदी तीरी अर्पण केली जाते
निरंग सत्वाची वाळू.
अगदी तितक्याच निर्लेपपणे, निरपेक्षपणे
जिथून आलो तिथेच संपणे
मोक्ष पावणे!
अन या सर्वांच्या मध्यात
फक्त मंडलाचे जगणे!

काश
काश, असे जगता आले असते तर?
तथागताचे शांत हसू
मग तरळले असते
प्रत्येकाच्याच ओठी...!

---

"चक्रपूर" - फनेल सारखे एक धातूचे साधन ज्यात वाळू भरून रांगोली- मंडल रेखले जाते.

----------------------------

ता . क. 
कविते बद्दल थोडेसे .. 


सर्व छायाचित्र नेट साभार 







----------------------------




Thursday, May 15, 2025

कोऽहम्

आकाश, क्षितीज, सागर

वितळत राहिले जीवनभर

सीमारेषा विरघळल्या पार

अन निरवतेत झिरपलं सार

कोऽहम् कोऽहम् ...



Friday, April 25, 2025

आहेस तू सोबत...

 मला माहितीय


माहिती आहे

तू आहेस सोबत!


इतका दूरचा पल्ला

हा पसरलेला जलाशय

माहिती आहे

तू आहेस सोबत


पण जरा वेळ

काही क्षण

विसावू या फांदीवर

पाहू दे तुला नीट

घेऊ दे छाती भरून श्वास

पंखांना थोडा आराम

माहिती आहे 

आहेस तू सोबत


सारे आयुष्य 

पार करायचेय

तुझ्या सोबत

या निळ्याशार 

जलाशया पलिकडे

आहे फुलांचे रान

उंच घनदाट वृक्ष

बांधायचेय घरटे

दोन चार पिल्ले

माहिती आहे

आहेसच तू सोबत

I know...

 I know

You are with me!


This is a long journey 

The vast expanse of world

But I know you're with me!


Just for a while,

A few moments,

Let’s rest on this branch

Let me see you clearly

Let me take a deep breath

Give my wings some rest

And I know

You are with me!


A whole life

We have to cross together

Beyond this deep blue lake,

There lies a field of flowers

Tall, dense trees

We have to build the nest

Raise a few little ones...

I know

You are indeed with me!

---

Monday, April 14, 2025

Alzheimer

Knowingly or unknowingly,

one by one,

the doors begin to close.


Though not literally closed 

they simply fade up...

into the surrounding walls.


The very idea of doors;

slowly disappears into 

the pale hues of the walls.


And memories slip away 

people, relationships, existence...

and the universe itself.


And then, what remains is

just a white plain canvas 

blank, blurry, diminishing...

Sunday, April 6, 2025

the kiss of death! (chat GPTच्या कृपेने )

( माझ्या अनुभव या कवितेचे भाषांतर. धन्यवाद सोनल इनामदार ) 

After an hour of yoga,
The entire body is exhausted, tired,
Now everything feels light, light,
The mind is calm, focused in meditation.
Softly, in front of closed eyes,
A gentle cloud floats,
And in front of it, I am still.

The cool, fresh breeze around,
A feeling of contentment fills me,
The endless experience of peace,
Floating without existence.

Slowly, the cloud moves forward,
Its invisible touch,
Yet, the body and mind feel it,
A soft, gentle kiss!

A delicate, unfamiliar sensation,
And then, the awareness of reality,
Intense, elevated, a blazing awareness,
For a moment, the mind trembles,
The body sighs, the heart pounds,
And immediately, I realize, I am alive!

And then, the moment that has passed,
Tries to come back,
There’s a possibility, it’s preparing,
To make me, me again, for that.

How delightful it is,
To experience and know all this,
To feel it in the body, in the heart,
To embrace it within, and digest it,
A kiss of death!