Friday, April 25, 2025

आहेस तू सोबत...

 मला माहितीय


माहिती आहे

तू आहेस सोबत!


इतका दूरचा पल्ला

हा पसरलेला जलाशय

माहिती आहे

तू आहेस सोबत


पण जरा वेळ

काही क्षण

विसावू या फांदीवर

पाहू दे तुला नीट

घेऊ दे छाती भरून श्वास

पंखांना थोडा आराम

माहिती आहे 

आहेस तू सोबत


सारे आयुष्य 

पार करायचेय

तुझ्या सोबत

या निळ्याशार 

जलाशया पलिकडे

आहे फुलांचे रान

उंच घनदाट वृक्ष

बांधायचेय घरटे

दोन चार पिल्ले

माहिती आहे

आहेसच तू सोबत

No comments:

Post a Comment