दिंडी निघोन गेली कधीची, पहाटेच्या निरवतेस
निर्मल्या सोबत मी मागे, पंढरीची आस.
रामकृष्ण हरी घोष, सर्वांच्या ओठी होता
माझ्या अंतिम यात्रेचा तो, रामनाम होता
सोडला शेवटचा तो श्वास, सुटकेचा होता
माझ्या खुन्याचा तो, अबोल शोक होता
----
{माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता मला साधायची होती. पण इतरांसोबत, इतरांसारखी नाही. त्यामुळे सर्वांच्या बरोबर मी नाही गेले.
सर्वांच्या जगण्याची पद्धत(रामकृष्णहरी घोष) बघण्याचा नादात मी माझी जगण्याची पद्धत शोधायलाच विसरले.
माझ्यातलं चटकन पुढे न होणं, रादर शक्यता असून स्वत:ची वाट ठामपणे न धरणं. यातून माझीच प्रगती खुंटवली. तर हे जे माझ्यातलं झिजकणं आहे ते म्हणजे माझीच मी खुनी असणं.
हे सगळं समजे पर्यंत शेवट जवळ आला. पण हे समजलं म्हणून मी सुटकेचा श्वास सोडला. अन माझ्यातल्या त्या खुन्याला या सगळ्याचे दु:ख ही आहे.}
No comments:
Post a Comment