सारे हारून गेल्या सारखा कधीचा
हा कोसळतो आहे पाऊस कधीचा
किती काय काय साचले मनात
अन सुना घराचा कोपरा कधीचा
जखमा किती तरी शब्द-अशब्दांच्या
भावनांचा वाहे प्रपात अखंड कधीचा
झाले रिते रिते अता आकाश सारे
ओथंबून वळचणीला थेंब एक कधीचा
No comments:
Post a Comment