Thursday, February 13, 2020

भान



किती हरखलो पाहुन प्रतिमा
रंगीत भरजरी सुरेख फुलोरा

उतरवून ठेविला मीच कधीचा
मळवट पायाशी मम पानांचा

छे, नाही, नव्हती ती प्रतिमा
तो तर आठव पानगळीचा

निश्चल कणखर मी आज असा
रुतून तळ्याशी निष्पर्ण उभा



No comments:

Post a Comment