Friday, October 2, 2020

कापडचोपड

 कापडं ...


किती विविध ढंगी न?
कधी जाड कधी अलवार
कधी पारदर्शी कधी घट्ट वीण
कधी रेशमी कधी सुती तलम
कधी भरजरी कधी रेशमी
कधी ठेवणीतली कधी रोज वापर

का बरं फरक असा???
सूत वेगळं त्याची वाढ वेगळी
नंतरची हाताळणी - प्रक्रिया वेगळी
बांधणी वीण वेगळी रंग वेगळे
कापणी मांडणी शिवण सजावट
ते तर पार पार वेगळंच की

मग रंगरुप वेगळं असणारच
पण नावं देतोच, ठेवतोच
कोणी प्रेमळ, कोणी शिस्तीचं
कोणी निर्विकार कोणी अघळपघळ
कोणी रोमँटिक कोणी कठोर
कोणी हळवं कोणी तर्ककर्कश्य

चला सोडून द्यावीत वरची रंगरुपं
आज जरा आत डोकावूत
नुसतं कापड न पहाता वरवरचं
कापडचोपड होणं शोधायला हवं
नावं तर काय ठेवतातच लोकं
आतलं माणूसपण शोधायला हवं

No comments:

Post a Comment