Wednesday, June 5, 2019

अंतरिक्ष स्तंभ



विश्वासाचा खांब
अगदी मध्यात,
तरंगता...

आजुबाजुला आहेतच इतरही
रुढी परंपरांचे खांब
जबाबदाऱ्या, अपेक्षांचे खांब
अपेक्षा, अधिकारांचे खांब
प्रेम, आदर, आपुलकीचे खांब
अगदी दैनंदिन कामकाजांचेही खांब

या सर्वांच्या आधाराने उभा आहे,
अगदी किस्टोन असलेला
विश्वासाचा ते एक खांब
आहे अधांतरीच, इतरांवर भार टाकून
अगदी थोडासा धक्काही
पुरेसा आहे, त्याला निखळायला

हलतो तो कधी कधी
इतरांच्या नादाने
पण तो निखळता कामा नये
तो जर खाली आला तर..
तर सारे मंदिर ढासळेल
सारा डोलाराच खाली येईल

विश्वासाचा स्तंभ!
अस्तित्वाचा स्तंभ!!
अंतरिक्ष स्तंभ !!!
- आरती

(यामागे एक कथा आहे. लेपाक्षी मंदिरात  हा अंतरिक्ष स्तंभ आहे.
जमिनीपासून वर उचललेला मध्यातला स्तंभ. पण किस्टोन. तो पडला तर सारे मंदिर पडेल असा)

No comments:

Post a Comment