हे आज निघाले आभाळीचे ढग
करी सोबत त्या एकाकी एक खगक्षितिजावर उभे, लालकेशरी रंग
धुसर धुक्याची, दुलई असे संग
टपटपे ही धारांची, अविरत गाज
कौलाशी सजे, पागोळ्यांचा साज
ओलेती थंडगार, ओसरती सांज
सुसाट वारा वाजवी, पानांची झांज
चमके मधेच वेडी, एखादी वीज
येई उतरुनी हळुच, नयनी नीज