छोटे छोटे
थेंब चिमुकले
नभांनाही
जड झाले
पावसानेही
दिले टाकूनी
पर्वतालाही
पेलले नाही
नद-नद्यांनी
दिले वाहूनी
अखेर त्यांना
रडूच फुटले
खारट आपले
अश्रू घेऊनी
समुद्राच्या
कुशीत शिरले
थेंब चिमुकले
नभांनाही
जड झाले
पावसानेही
दिले टाकूनी
पर्वतालाही
पेलले नाही
नद-नद्यांनी
दिले वाहूनी
अखेर त्यांना
रडूच फुटले
खारट आपले
अश्रू घेऊनी
समुद्राच्या
कुशीत शिरले