Tuesday, September 10, 2019

अनादी अनंत


वाहते कधीची, ही नदी निर्झरी
शोधित चाललो, तू न मी दिगंतरी

दोन काठांवरी, नांदते वेगळी
पण कशी कोणती, नाळ आहे अंतरी

नात्यात आपुल्या, जाहल्या पडझडी
पण पुन्हा सांधल्या, मनाच्या ओंजळी

दावितो मी तुला, गगनी ही तर्जनी
सारे दाविशी तु, तुझिया दो अंजनी

पुजते जग सारे, मजसी अंतर्यामी
अन मनी माझिया, तूच तू निर्झरी


Sunday, September 8, 2019

कळिकाळ


पाऊस पाऊस पाऊस
सगळा धुवाँधार पाऊस!
पांढरा पाऊस, काळा पाऊस

केशरी, निळा, हिरवा... 
पाऊस....
पाऊस!

हरवलं पाण्याचं नितळपण
रंगांचं इंद्रधनुष्य नुसतं, 
पण गढूळ काळसर

स्वच्छ, स्फटिक, निर्मळ, नितळ
बघणार दिसणार कसा पाऊस
चकचकित लोलक आभाळभर

कळिकाळ सरकतो पुढे पुढे
पाऊले, पाऊलवाटा त्याच्या
नकळे कळणार कधी...