Friday, February 1, 2013

जिवंत!


ओली जखम
सुकली, खपलीही धरली
खपली सुकली; पडूनही गेली
व्रण,...तो ही झाला; फिका ... फिका

वाटलं
सारं शांतावलं
झाला त्या
वादळाचा अंत...!

अन एका
ऊबदार क्षणी
सारे भसाभस
ऊतू गेले

किती प्रयत्नांनी
वरून घातलेले
निर्विकारपणाचे खडक
पाझरले, वितळले

खाली तसाच;
तसाच्या तसाच
लाव्हा खदखदत
जिवंत!