Thursday, December 23, 2010

नवी ज्योत


थांब थांब, विझू नकोस, नकोस फडफडू .

मान्य आहे अंधारलय, ज्योतीने ज्योत पेटवावीच लागेल !

पण पाहिलस ना, जगात वाहणारा जोराचा वारा .

त्यातून तुझ्या हाती, नव्या जगातली, नवी ज्योत !

अगं लोकांना लागेल थोडा वेळ .

तुझ्या ज्योतीचे ओळखायला, तेज !

पण एक नक्की, येतील एकेक, आपणहून .

तोपर्यंत थांब, विझू नकोस, नको फडफडूस !

८.१२.२००८

No comments:

Post a Comment