Sunday, March 20, 1988

जीव बैचेन बैचेन ...

जीव बैचेन बैचेन
झाला आज अनावर।

गेले क्षण तास काळ
मनी उफाळे जंजाळ
आज उदास उदास
पडे वेठीचा हा आस ।

झाले कित्तेक दिवस
माझा मलाच हा सोस
ना उठला मम अक्ष
ना मानला पर पक्ष
माझी माझ्यातच गुंग
नाकारला सतसंग ।

मन म्हणे शोध शोध
सूर, शब्द अन बोध
होई एकच आभास
लागे कवितेची आस
धुके भावनांचे पुरे रे
फुटो शब्दांचे धुमारे ।

जीव बैचेन बैचेन
झाला आज अनावर।

No comments:

Post a Comment